कोरोनाबाबात विद्यार्थिनींची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:10 IST2021-06-02T04:10:04+5:302021-06-02T04:10:04+5:30
या पोस्टरचे अनावरण सरपंच निवृत्ती नेहेर यांच्या हस्ते झाले. वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या मानसी ढमालेने ...

कोरोनाबाबात विद्यार्थिनींची जनजागृती
या पोस्टरचे अनावरण सरपंच निवृत्ती नेहेर यांच्या हस्ते झाले. वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या मानसी ढमालेने नागरिकांना धीर देऊन, सकारात्मक विचार संवर्धन करण्यासाठी, सहज समजेल अशा साध्या पद्धतीच्या लेखनाच्या मांडणीचे पोस्टर्स, गावातील बाजारपेठ, बँका, पतसंस्था, शाळा, हाॅटेल, एसटी स्टँड आदी लक्षवेधी ठिकाणी लावले आहेत.
पोस्टर्स अनावरणप्रसंगी माजी सरपंच दामोदर बंदावणे, राजेंद्र खळदकर, चेअरमन पंडित मोढवे, सुदाम ढमाले, ज्ञानेश्वर तुपे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब बोंबले, ग्रा. पं. सदस्य हेमलता खळदकर, संदीप धायबर तसेच मनोज पिंगळे, कुमार ढमाले, नामदेव शेंडे, अनिल अरगडे, सदाशिव चव्हाण आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०१ कडूस पोस्टर्स
सोबत फोटो - कडूस येथील बाजारपेठेत कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती वाचताना ग्रामस्थ.