शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुण्यातील आरटीओ कार्यालयात काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 13:45 IST

राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे

ठळक मुद्देपुण्यातील मुख्य कार्यालयासह पिंपरी चिंचवड सोलापूर आदी कार्यालयांचे कामकाज बंद राज्यस्तरीय संघटनेमार्फत वारंवार पाठुपरावा करूनही प्रशासनाकडून दखल नाही घेतली

पुणे : कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. १) राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून सुरु असलेल्या काम बंद आंदोलनाचे पडसाद उमटले. शुक्रवारी पुण्यातील आरटीओ कार्यालयात सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे  सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे राज्यभरासह शहरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कांदे व सचिव प्रशांत पवार यांनी ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध व पदांची फेररचना याबाबत राज्यस्तरीय संघटनेमार्फत वारंवार पाठुपरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या पदोन्नतीसाठी अत्यल्प पदे असून अनेक पदे रिक्त आहेत. एका कर्मचाऱ्यांकडे किमान दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. पदोन्नतीसाठी असलेले चार स्तर कमी करण्यात यावेत व वर्ग ब ची पदे वाढवून मिळावीत अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली असल्याचे कांदे यांनी सांगितले.ऑक्टोबर २०१८ रोजी संघटनेने काळ्या फिती लावून काम केले. तर दि. ३ जानेवारीला सकाळी १० ते १२ यावेळेत ठिय्या आंदोलन केले होते. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी  राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुण्यातील मुख्य कार्यालयासह पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज येथील कार्यालयांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आरटीओ कार्यालयामध्ये येण्याचे टाळावे, असे आवाहन कांदे यांनी केले आहे.---------------------आंदोलन न करण्याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. पण काम बंद ठेवल्यास सर्व कामांवर परिणाम होईल. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRto officeआरटीओ ऑफीसStrikeसंप