शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 11:03 IST

ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या फ्लॅटमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. जितसिंग राजपाल सिंग टाक (वय २४, रा. बिराजदार नगर, वैदुवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जितसिंग टाक हा निगडी येथे एका ठिकाणी क्रिकेट खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहका-यांना मिळाली, त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हडपसर येथे काही दिवसांपूर्वी दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही जणांना पकडले होते. त्यावेळी जितसिंग हा पळून गेला होता.जितसिंग याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने भांडारकर रोडवर घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील २, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एक घरफोडी आणि भोसरीतील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जितसिंग याचा साथीदार सध्या येरवडा तुरुंगात असून त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात १८ डिसेंबर २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. बंद असलेली पु. ल. देशपांडे यांची दोन्ही घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. पु. ल. देशपांडे यांच्या घरात केवळ पुस्तके व अन्य साहित्य असल्याने त्यांनी संपूर्ण घरात नसती उठाठेव केली, परंतु त्यांना त्यांच्या दृष्टीने मौल्यवान असे काहीही मिळाले नाही. त्यांनी कपाटातील हे साहित्य अस्ताव्यस्त करून टाकून दिले व तेथून निघून गेले होते. ही बाब दुस-या दिवशी उघड झाली. पु. ल. देशपांडे यांचे नातेवाईक दिनेश ठाकूर यांनी अमेरिकेतून आल्यावर याविषयी फिर्याद दिली होती. पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा हा दुस-यांदा हा प्रयत्न झाला होता. इमारतीच्या मागच्या बाजूने शिरलेले हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असले तरी त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नव्हते.संपूर्ण राज्यभरात या चोरीच्या प्रयत्नाने एकच खळबळ माजली होती. त्यामुळे चोरीच्या या प्रयत्नाचा छडा लावणे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहका-यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या बीएमसीसी रोडवरील फलॅटमध्ये शिरून चोरट्यांनी काही लाखांचा ऐवज चोरून नेला होता. हा घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. मात्र, चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मौल्यवान घड्याळ अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

टॅग्स :Puneपुणे