पुणे : एकत्रित कुटुंबपद्धतीत बदल होत चालल्याने मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थांची गरज निर्माण झाली आहे. मानसिकदृष्ट्या त्यांना मदतीची गरज असते. मानसिक उपचारानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना काही तरी करणे आवश्यक असते. तेही उत्पादनक्षम काम करू शकतात, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केला.चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर येथील मनोरुग्णांनी चालविलेल्या बेकरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, चितळे बंधू मिठाईवालेचे संजय चितळे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी, सतीश आळेकर, ‘चैतन्य’च्या संचालिका सुषुप्ती साठे आदी यावेळी उपस्थित होते. सुप्रिया शिंदे आणि ऋत्विक पंडित हे सेंटरमधील मनोरुग्णांना बेकरीजन्य पदार्थ शिकवितात.
मनोरुग्णही उत्पादनक्षम होऊ शकतात- डॉ. मोहन आगाशे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:00 IST