वीजप्रश्नासाठी १२ कोटींचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST2021-06-06T04:08:12+5:302021-06-06T04:08:12+5:30

मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे ऊजामंत्री डॉ. राऊत यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत मागणी सुळे यांनी ...

Provide Rs. 12 crore for power supply | वीजप्रश्नासाठी १२ कोटींचा निधी द्या

वीजप्रश्नासाठी १२ कोटींचा निधी द्या

मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे ऊजामंत्री डॉ. राऊत यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत मागणी सुळे यांनी केली. यासोबतच रहाटणी ते वरसगाव सब स्टेशनला आणखी एक विद्युतवाहिनी द्यावी तसेच भाटघर येथील १३२ केव्ही सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, असेही त्या म्हणाल्या. पुरंदर आणि बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी हा मुद्दा देखील या बैठकीत सुळे यांनी उपस्थित केला.

बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, हवेली हे तालुके आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात एकूण २२ ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारणीसाठी मंजुरी मिळावी अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली. या वेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते.

Web Title: Provide Rs. 12 crore for power supply