श्रमशाळेचे परिपोषण आहार अनुदाना द्या : मखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:11 IST2021-01-23T04:11:44+5:302021-01-23T04:11:44+5:30
निवेदनात म्हटले आहे की, शासन, प्रशासनाकडून माझ्या आश्रमशाळांना नेहमीच सापत्नवाची वागणूक मिळत असून, मला संस्थेचा अध्यक्ष ह्या नात्याने नेहमीच ...

श्रमशाळेचे परिपोषण आहार अनुदाना द्या : मखरे
निवेदनात म्हटले आहे की, शासन, प्रशासनाकडून माझ्या आश्रमशाळांना नेहमीच सापत्नवाची वागणूक मिळत असून, मला संस्थेचा अध्यक्ष ह्या नात्याने नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकारी शर्तीने करत असतात. मी शिव, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक असून त्यांना अभिप्रेत असलेल्या विजाभज इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा. त्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय व्हावी, ह्याचं उदात्त हेतूने प्रेरित होऊन मी मागील २० वर्षांपासून संस्था उत्कृष्ठपणे चालवित आहे.
परंतु प्रशासनातील अधिकारी विशेषतः सामाजिक न्याय विभागाचे, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी जाणून बुजून मला व माझ्या आश्रमशाळांना त्रास देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. --