शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या, ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:53 IST

१ जानेवारीच्या दंगलीमध्ये ग्रामस्थांचे २५ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. तरीही प्रसारमाध्यमांत गावाचेच नाव बदनाम होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

कोरेगाव भीमा (जि. पुणे)  - १ जानेवारीच्या दंगलीमध्ये ग्रामस्थांचे २५ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. तरीही प्रसारमाध्यमांत गावाचेच नाव बदनाम होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.स्थानिक महिलांनी सांगितले, स्थानिकांनी जाळपोळ केल्याचे वृत्तवाहिन्यांवर सांगत आहेत. हे साफ चुकीचे आहे. आम्ही आमच्याच मालमत्तेचे नुकसान कसे करू शकतो? आम्ही आमचीच घरे, दुकाने जाळू शकतो का?१ जानेवारीला गाव बंद असल्याबाबत ग्रामस्थ म्हणाले, वढू येथील समाधीवरून झालेल्या वादाचे पडसाद गावात उमटू नयेत यासाठी ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवली होती. गावातील वैजयंता संजय मुथा या महिलेच्या उपजीविकेचे साधन असलेले दुकान दंगलखोरांनी जाळून टाकले. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुन्हा जमावबंदीकोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील दंगलीत स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्यापही लोक एकत्र जमा होऊन दंगल निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रूक, सणसवाडी, शिक्रापूर व कोंढापुरी या गावांमध्ये ५ ते १० जानेवारी या काळात रात्री १२ वाजेपर्यंत पुन्हा जमावबंदी आदेश लागू केल्याचे प्रांताधिकारी भाऊ गलांडे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची शांतता रॅलीदंगलीच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शांतता रॅली काढून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दोन्ही समाजांमधील ग्र्रामस्थांच्या बैठका घेतल्या.बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका - गिरीश बापटदिवंगत राहुल फटांगडे कुटुंबास शासनस्तरावर शक्य ती मदत केली जाईल. नुकसानग्रस्तांचे पंचनामेही वस्तुस्थितीला धरून करण्याचा आदेश प्रशासनाला दिल्याचे सांगत कोणावरही अन्याय होणार नाही, बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शुक्रवारी बापट यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे