शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:06 IST

महापालिका आयुक्तांना दिल्या प्रलंबित कामांबाबत सूचना

पुणे : पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करुन प्राधान्यक्रमाने ड्रेनेज, रस्ते, पाणी पुरवठा, वीज आदी कामांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी. यापूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांतील शाळा, अंगणवाड्या पालिका प्रशासनाशी जोडून घ्याव्यात तसेच वर्ग करून घेतलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे पगार नियमित करावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे पत्र दिले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे, वंदना धुमाळ, भरत झांबरे उपस्थित होते. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून ग्रामपंचायत आणि पालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या करामध्ये तफावत आहे. पालिकेचा कर जास्त असूनही पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. पालिकेची कर आकारणी ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी.

यापुर्वी समावेश झालेल्या ११ गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, त्यांच्या अस्थापना अजूनही जिल्हा परिषदेकडेच आहेत. त्या पालिकेकडे वर्ग कराव्यात. तसेच पालिकेत वर्ग झालेल्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना पालिकेच्या आरोग्य आदी सेवा दिल्या जाव्यात. या गावांमधील निधी अभावी थांबलेली कामे आगामी अंदाजपत्रकात तरतूद करुन कामे पुर्ण करावीत. करारपद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन नाही. त्यावर कार्यवाही करावी अशा सूचना सुळे यांनी केल्या.====

 मुंबई-बेंगलुरु महामार्गावरील नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केल्या. यासंबंधी  सुळे आणि चाकणकर यांना सजग महिला मंच, अनिता मुनोत मैत्री ग्रुप, सन्मती महिला मंडळ, न-हे शक्ती ग्रुप, तसेच न-हे गावातील विविध सोसायट्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त