समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:26+5:302021-01-08T04:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करुन प्राधान्यक्रमाने ड्रेनेज, रस्ते, ...

Provide funds for the development of included villages | समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा

समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करुन प्राधान्यक्रमाने ड्रेनेज, रस्ते, पाणी पुरवठा, वीज आदी कामांसाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी. यापूर्वी समाविष्ट ११ गावांतील शाळा, अंगणवाड्या पालिका प्रशासनाशी जोडून घ्याव्यात तसेच वर्ग करून घेतलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे पगार नियमित करावेत, आदी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या.

सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे पत्र दिले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे, वंदना धुमाळ, भरत झांबरे उपस्थित होते. नव्याने समाविष्ट गावांमधून ग्रामपंचायत आणि पालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या करात तफावत आहे. पालिकेचा कर जास्त असूनही पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. पालिकेची कर आकारणी ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी.

यापुर्वी समावेश झालेल्या ११ गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, त्यांच्या अस्थापना अजूनही जिल्हा परिषदेकडेच आहेत. त्या पालिकेकडे वर्ग कराव्यात. या गावांमधील निधी अभावी थांबलेली कामे आगामी अंदाजपत्रकात तरतूद करुन कामे पुर्ण करावीत. करारपद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन नाही. त्यावर कार्यवाही करावी असे सुळे म्हणाल्या.

Web Title: Provide funds for the development of included villages