शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद..! पुणेकरांच्या ‘ब्लॅक ॲन्ड व्हाइट’ फोटोला सर्वोच्च सन्मान

By श्रीकिशन काळे | Updated: November 25, 2024 18:28 IST

पुण्यातील राहुल सचदेव, एम.एस. रंगनाथन यांना जागतिक स्तरावर गौरव

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार राहुल सचदेव आणि एम. एस. रंगनाथन यांनी प्रतिष्ठेच्या हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्डमध्ये (एचआयपीए) सर्वोच्च सन्मान मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण फोटोग्राफी स्पर्धांपैकी एक म्हणून एचआयपीए फोटोग्राफी स्पर्धा ओळखली जाते. विशेष म्हणजे १०० हून अधिक देशांमधील हजारो छायाचित्रकार स्पर्धेत दरवर्षी सहभागी होतात.राहुल सचदेव हे पुण्यातील प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार असून त्यांनी टिपलेल्या पांढऱ्या गेंड्याच्या छायाचित्राला स्पर्धेतील जनरल कलर कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. कथानकाच्या मदतीने नैसर्गिक जगतातील टिपलेले क्षण हे राहुल यांच्या छात्राचित्रणाचे वैशिष्ट्य असून त्यांच्या पांढऱ्या गेंड्याचा फोटो परीक्षकांच्या पसंतीस उतरला. स्पर्धेतील यशाबद्दल राहुल सचदेव म्हणाले, "फोटोग्राफी या कलेकडे मी केवळ व्हिज्युअल्स म्हणून पाहत नाही, तर फोटोच्या चौकटीच्या पलीकडे जात भावनिक बंध निर्माण करणारे एक साधन म्हणून पाहतो. माझ्या स्टोरीटेलिंगच्या या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने जणू मान्यता मिळाली असे मी मानतो.”राहुल सचदेव यांसोबतच या स्पर्धेत अनुभवी वन्यजीव छायाचित्रकार एम. एस. रंगनाथन यांना देखील त्यांच्या ध्रुवीय अस्वलाच्या अप्रतिम छायाचित्रासाठी सस्टेनेबिलिटी कॅटेगरीमध्ये तिसऱ्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. रंगनाथन यांनी राहुल यांच्या मार्गदर्शनाखालीच १५ हून अधिक कार्यशाळांमध्ये भाग घेत सर्जनशीलतेचे नवे आयाम शोधले आहेत.रंगनाथन म्हणाले, “वन्यजीव छायाचित्रण माझ्यासाठी कथा सांगण्याचे एक सशक्त साधन आहे असे मला वाटते. वन्यजीव छायाचित्रकार म्हणून आपल्याला नैसर्गिक जगाचे सौंदर्य आणि सार अनुभवायला व टिपायला मिळते. मात्र असे असले तरी, ही कला आव्हानात्मक आहे असे मला वाटते.” एकाच स्पर्धेत आम्ही दोन मित्र व सहकाऱ्यांनी अव्वल स्थान मिळविणे हे देखील विलक्षण आनंदाचा अनुभव देणारे असल्याचे राहुल यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPhotography Dayफोटोग्राफी डे