शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! पुण्याची जागतिक पातळीवर 'शानदार' कामगिरी; '२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज' स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 18:31 IST

भारतातील केवळ दोन शहरे त्यापैकी पुणे -जगभरातील ६३१ महापौरांमधून निवड

कोरोना महामारीशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणार्‍या शहरांसाठी घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल २०२१ मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या वतीने ‘२०२१ ग्लोबल मेयर चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये ९९ देशांतील ६३१ शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे. 

पुणे शहराच्या वतीने सर्व इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यसाठी महत्त्वपूर्ण पाया’ ही योजना ‘२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज’ या स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होईल. आणि यातून अंतिम १५ शहरांची निवड होईल. यात निवड होणार्‍या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाईल. या स्पर्धेविषयी अधिक तपशील देताना ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले की, ‘‘कोरोना महामारीच्या प्रचंड आव्हानांचा सामना करत असताना, अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांमध्ये या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.’’

या निवडीबद्दल बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक व्हेईकल याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे, परंतु त्याचबरोबर झालेल्या शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. पर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे.

इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांचा व्यापक स्तरावर वापर करण्याचा आमचा संकल्प आहे. पुणे शहरात विजेवर चालणार्‍या वाहनांच्या वापरासाठी योजना आखून तिची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. या योजनेची जगभरातील अन्य शहरांद्वारेही अंमलबजावणी केली जाईल. मला खात्री आहे. आम्ही राबवत असलेल्या संकल्पनेमुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल आणि पुण्याच्या नागरिकांना उत्तम आरोग्यही लाभेल, असेही महापौर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे शहरात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन निधी उभारून लवकरात लवकर इलेक्ट्रिक व्हेइकल्स सुरुवात करण्याचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केला आहे. विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी कृतीयोग्य धोरणे आखणे व ही वाहने चालवण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनांचा आराखडा महापालिका तयार करेल. यासाठीचा इव्ही निधी हा वाहनांकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सवलती, चार्जिंग स्टेशन्स, इतर संभाव्य संबंधित घटक अशा सर्व गोष्टींचा एकत्रित आराखडा तयार करण्याकरिता वापरला जाईल.’’

विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर सुरू करण्याकरिता पुणे महापालिका ब्लूमबर्ग निधीचा विनियोग पुढील गोष्टींसाठी करेल 

१) सिटी इव्ही रेडिनेस प्लॅन तयार करणे

२) सिटी इव्ही निधी उभारणे

पुणे महानगरपालिका गरजूंचे मूल्यमापन करेल आणि योजनेतील कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे निश्चित करण्याकरिता काही कार्यशाळा आयोजित करेल.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर