घरासमोर काळे झेंडे उभारून बैलगाडामालकांचा निषेध
By Admin | Updated: January 19, 2015 00:05 IST2015-01-19T00:05:40+5:302015-01-19T00:05:40+5:30
बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्यामुळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेतील युवकांनी घरांसमोर काळे झेंडे

घरासमोर काळे झेंडे उभारून बैलगाडामालकांचा निषेध
वाघोली : बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्यामुळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेतील युवकांनी घरांसमोर काळे झेंडे उभारून बैलगाडा शर्यतबंदीचा निषेध केला. जोपर्यंत बैलगाडा शर्यती सुरू होत नाहीत तोपर्यंत झेंडे घरावरून उतरविणार नसल्याचा निर्धार युवकांनी केला आहे.
तमिळनाडूमध्ये मकरसंक्रांतीला बैलांच्या शर्यतीच्या स्पर्धा घेतल्या जातात; परंतु अद्यापपर्यंत बैलांचे खेळ घेण्याबाबतची बंदी न उठवल्याने तमिळ नागरिकांनी आक्रमक होऊन आपल्या घरासमोर काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा वेळ काढू धोरणाचा निषेध केला आहे. देशपातळीवर हा लढा व्यापक प्रमाणावर करता यावा म्हणून महाराष्ट्रातही बैलगाडा संघटनांतील युवक आणि गाडामालकांकडून घरांसमोर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला जात आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भातील लढा यशस्वी करण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यातील युवकांनी कंबर कसली आहे. जोपर्यंत बैलगाडा शर्यती चालू होत नाहीत तोपर्यंत घरासमोरील काळा झेंडा काढणार नाही, असे पारनेर तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी सांगितले.