शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:03 IST

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली, या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिलंय. मात्र हे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे, या प्रकरणावरून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचाच एकमेकांशी मेळ नसल्याचे अधोरेखित झाले आहे. भाजपच्या महिला आघाडीने घेतलेली भूमिका भाजपच्याच खासदारांना न पटल्याने त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष धीरज घाटेंनीही महिला आघाडीकडून झालेली तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हणत खासदारांच्या भूमिकेला फारसे गांभीर्याने घेतलं नसल्याचे दिसून आले आहे. 

घाटे म्हणाले, त्याच्यात काही गैर नाही. कारण एका महिलेचा त्याच्यामध्ये  मृत्यू झालाय. एका महिलेच्या संदर्भात ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदाताई परांजपे आणि त्यांच्या सर्वच टीमने जे आंदोलन केलं असेल त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये योग्य प्रतिक्रिया त्या दिवशी दिलेली आहे. मी सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी या संदर्भात बोललो त्यांची भूमिका त्यांची बाजू ऐकून घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातलं एक खूप मोठं आणि नावलौकिक असणारं रुग्णालय आहे. अनेक चांगली कामं रुग्णांना सुविधा देणं हे ते गेल्या अनेक वर्ष करताहेत. पण ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या संघटनांनी आंदोलनं केली आणि महिला मोर्चा सुद्धा त्या दिवशी त्याठिकाणी येऊन त्यांनी हे आंदोलन केला. मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे.

त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाही

मला असं वाटतं की माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते. पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत. पुण्यात नेतृत्व करणारी चार-पाच जणांची टीम आहे. सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती व्यक्त होणं. आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाही आहे.

टॅग्स :Puneपुणेmedha kulkarniमेधा कुलकर्णीBJPभाजपाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस