शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 19:22 IST

ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाचा पुणे महानगरपालिकेला विसर पडला अाहे. त्यांच्या स्माराकला मूर्त स्वरुप प्राप्त व्हाव यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला.

पुणे : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी सुसज्ज स्मारक उभारण्याच्या घोषणेचा पुणे महापालिकेला विसर पडला आहे. केवळ कागदावर राहिलेली घोषणा प्रत्यक्षात उतरावी आणि स्मारकाला मूर्त स्वरुप प्राप्त व्हावे, ही मागणी पुणेकर रसिकांकडून प्राधान्याने केली जात आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला.  ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक झालेच पाहिजे, अशी मागणी करणारी पत्रके सर्वांच्या हातामध्ये होती.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवादचे सुनील महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे, गदिमांचा नातू सुमित्र माडगूळकर, पणती पलोमा माडगूळकर, राजा महाजन, प्रवीण वाळिंबे, उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, नंदकुमार काकिर्डे, भाग्यश्री देसाई, मोहन कुलकर्णी, हेमंत मावळे, संतोष चोरडिया, प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते. 

    जोशी म्हणाले, ‘गदिमा आपल्यातून गेल्याला ४१ वर्षे झाली. इतक्या वर्षांत त्यांचे स्मारक साकारता आले नाही हे आपल्या कारभाºयांच्या असंवेदनशीलता, निगरगट्टपणा आणि प्रतिसादशून्यतेचे द्योतक म्हणावे लागेल. गदिमांचे स्मारक हा मराठी रसिकांच्या अस्मितेचा मुद्दा आहे.महाजन म्हणाले, ‘गदिमांचे स्मारक साकारावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राजकीय व प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत आहे. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी पुणेकरांच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.’ 

गदिमा स्मारकासाठी जागेचा शोधगदिमा यांच्या स्मारकासाठी महापालिकेने दिलेली जागा पूर रेषेमध्ये येत आहे. मात्र, स्मारकासाठी नवी जागा शोधण्यामध्ये महापौरांनी लक्ष घातले आहे. काही जागा पाहिल्या आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षास सोमवारपासून (१ आॅक्टोबर) प्रारंभ होत असताना या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका