इंधन दरवाढीविरोधात यवत येथे निषेध मोर्चा-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST2021-07-17T04:09:05+5:302021-07-17T04:09:05+5:30
यवत येथील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोध दर्शविला. यावेळी दौंड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस अध्यक्ष ...

इंधन दरवाढीविरोधात यवत येथे निषेध मोर्चा-
यवत येथील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोध दर्शविला. यावेळी दौंड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे, अरविंद दोरगे, मोहसीन तांबोळी, अल्ताफ शेख, गणेश दोरगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, खाद्यतेल यांच्या दारात भरमसाठ वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. मोलमजुरी करणारी कुटुंब आता जगायचे कसे आणि मिळणाऱ्या पैशात भागवायचे कसे या विवंचनेत सापडली आहेत. मात्र शासनाला याचे गांभीर्य नसल्याची टीका यावेळी विठ्ठल दोरगे यांनी केली.
यवत येथे इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली काढून निषेध करताना काँग्रेस कार्यकर्ते.