शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 20:11 IST

बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देदूध उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

बारामती : दुधाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ७०/३० च्या फॉर्म्युल्यानुसार दर द्यावा, देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना अनुदान मिळाले पाहिजे, यांसह इतर मागण्यांसाठी भवानीनगर (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. २८) बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरसिंह कदम व संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास रास्ता रोकोनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. यानंतर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पांडुरंग रायते, विलास सस्ते, महेंद्र तावरे, कल्याण भगत, संतोष ननवरे, पिंटू गुप्ते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कदम म्हणाले, दुधाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव मिळाला पाहिजे. ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार दूध दर मिळायला हवा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, कापूस, साखर, कांदा, तूर व अन्य पिकांच्या दरात चढउतार झाल्यानंतर राज्यशासन दरामध्ये हस्तक्षेप करते, त्याप्रमाणे दूध उत्पादकांनादेखील अनुदान स्वरूपात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करायला हवी, अशा विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कदम यांनी यावेळी दिला. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी भाषणात शासनाच्या धोरणावर टीका केली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मतभेद व मनभेद बाजूला ठेवून एकत्रित आंदोलनाद्वारे लढणार असल्याचे सांगून या मागण्या शेतकरी हिताच्या असून न्याय देण्यासाठी पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. 

टॅग्स :PuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmilkदूधState Governmentराज्य सरकार