शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपींना वाचविण्यासाठीच भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:22 IST

मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी भाजपने तथाकथित स्वयंघोषित सत्यशोधन समिती तयार केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

पुणे : कोरेगाव भिमा प्रकरणी भाजपाने स्वयंघोषित सत्यशोधन समिती तयार केली असून ती समिती मुख्य आरोपीवरुन लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी ही सत्यशोधन समिती तयार केल्याचेही पत्रात म्हंटले आहे.     भाजपाचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी गुुरुवारी पत्रकार परिषद घेत सत्यशोधन समितीचा अहवाल सादर केला होता.  त्यात  हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाºया फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा  यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीसांनी जर योग्य पाऊले उचलली असती तर ही दंगल रोखता आली असती असेही त्यांनी म्हंटले होते. त्यावर ही समिती संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी भाजपाने स्थापन केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.      मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी पोलीस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत होते. मनोहर भिडेंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री त्यांना निर्दोष असल्याचे सिद्ध करत आहेत. याचा अर्थ हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे हे सर्व सत्य असताना भाजपाची स्वयंघोषित सत्यशोधन समिती भिडे, एकबोटेंचे नाव न घेता एल्गाप्र परिषद, संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी संघटनांवर आरोप करुन संभ्रम निर्माण करीत आहे. असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर एल्गार परिषदेत झालेली भाषणांचे व्हीडीओ उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य कोणीही केलेले नाही. सरकारवर टीका म्हणजे प्रक्षोभक होत नाही. त्यामुळे परिवर्तनवादी संघटनांवर जे आरोप समिती करीत आहे ते बिनबुडाचे असल्याचेही या पत्रकात म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन समिती स्थापन केल्याचे सांगितले. मात्र ही समिती कोरेगाव भिमाला गेलेली नाही त्यामुळे सरकार या प्रकरणात टाळाटाळ करुन दिशाभूल करत आहे. तरी सर्व प्रथम मनोहर भिडे यांना अटक करुन या प्रकारणाचा सखोल तपास करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात आली आहे.  

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव