स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST2020-12-26T04:09:59+5:302020-12-26T04:09:59+5:30
पुणे : उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमधील ‘स्काय इन स्पा’ या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी पोलिसांनी एका ...

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोघांना कोठडी
पुणे : उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमधील ‘स्काय इन स्पा’ या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
नूतन अमोल धवन (रा. वॉर्ड क्रमांक दोन, केशवनगर) आणि रवी बलभीम जमादार (रा. बुद्ध विहार मागे, पंचशीलनगर, घोरपडी) यांना ही कोठडी सुनावली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांनी फिर्याद दिली होती.
या स्पावर बुधवारी (ता. २३) कारवाई करीत तेथून सात महिलांची सुटका केली. संबंधित स्पा सेंटर हे नूतन चालवत आहे. तर त्या ठिकाणी येथील व्यवस्थापक रवी याच्यामार्फत महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता, असे फिर्यादीत नमूद आहे. वेश्या व्यवसाय करून घेण्यासाठी आरोपींना या महिला कोणामार्फत मिळवल्या, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यांनी किती पैसे कमावले, त्यांनी आणखी काही महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मिळवल्या आहेत का, याची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी सुनाविण्याचा युक्तिवाद
सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. न्यायालयाने ही मागणी मंजूर केली.