शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:07 IST

मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सातजणींना ताब्यात घेण्यात आले

पुणे: कोरेगाव पार्क भागातील मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सातजणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क भागातील साउथ मेन रस्त्यावरील एका सोसायटीत द सिग्नेचर थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमध्ये परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली आणि मसाज सेंटरवर छापा टाकला.

पोलिसांनी थायलंडमधील चार महिलांसह सातजणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरचा व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (३८, रा. खराडी) आणि चालक गजानन दत्तात्रय आडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनकांबळेला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरमधील महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसWomenमहिला