पाणीपट्टीत ५० टक्के वाढ प्रस्तावित
By Admin | Updated: January 19, 2016 01:51 IST2016-01-19T01:51:19+5:302016-01-19T01:51:19+5:30
पुणे : शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे.

पाणीपट्टीत ५० टक्के वाढ प्रस्तावित
पुणे : शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे त्याकरिता पाणीपट्टीमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांनाही नाममात्र पापणीपट्टी लागू करण्याचे त्यांनी त्यामध्ये नमूद केले आहे.
शहरामध्ये २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने २४ तास पाणी पुरवठा करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर सर्व घरांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पाणी चोरी व पाण्याची गळती याला रोख लावला जाणार आहे. वितरण व्यवस्थेतील मानवी हस्तक्षेप कमी करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या नलिका कायम भरलेल्या राहणार असल्याने पाण्याचे पाईप फुटणे व पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे. दुरूस्तीसाठी संपुर्ण भागाचा पाणीपुरवठा बंद न करता केवळ ठराविक भागापुरताच पाणीपुरवठा बंद ठेऊन दुरूस्ती करता येणे शक्य होणार आहे. पाण्याची जुनी वितरण व्यवस्था सुधारणे, पाण्याच्या टाक्यांची पुर्नबांधणी, अस्तित्त्वातील जलशुध्दीकरण केंद्राचे पुर्नवसन, ग्राहक सर्व्हेक्षण आदी कामे ३ हजार ३१२ कोटी रूपये खर्च करून केली जाणार आहेत.