संतती नियमनाचा प्रस्ताव राज्याकडे
By Admin | Updated: July 7, 2014 23:13 IST2014-07-07T23:13:42+5:302014-07-07T23:13:42+5:30
महापालिकेचे जे कर्मचारी एका मुलावर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या योजनेविषयी प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला होता.

संतती नियमनाचा प्रस्ताव राज्याकडे
पुणो : महापालिकेचे जे कर्मचारी एका मुलावर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या योजनेविषयी प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला होता. त्यामुळे ज्या कर्मचा:यांनी लाभ घेतला, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी लागण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र, स्थायी समितीने ही योजना कायम ठेवण्याचा निर्णय
घेतला असून, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिकेचे जे कर्मचारी एक मुलगा अथवा मुलगीवर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याची योजना होती. त्यानुसार 125 कर्मचा:यांनी प्रस्ताव दाखल केले होते, तर प्रत्यक्षात 2क् कर्मचा:यांनी लाभ घेतला. मात्र, काही वर्षानंतर महापालिका प्रशासनाला संबंधित योजनेची अंमलबजावणी करता येणार नसल्याची जाग आली. त्यानुसार ज्या 2क् कर्मचा:यांना वेतन वाढ दिली, त्यांचे वेतन परत वसूल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. मात्र, ही नामुष्की टाळण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी घेण्यात येणार आहे. तोर्पयत ज्या कर्मचा:यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून कोणतेही वेतन वसूल करण्यात येणार नाही, असे
स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे यांनी सांगितले.