शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन भवनमधील मालमत्ता व्यवस्थापन विभाग पांगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 15:26 IST

अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे पाहणी करण्यासाठी गाडी देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण शोधायला गाडीही नाही मंजूर पदांपैकी केवळ सहा पदेच कार्यरतराजकीय व्यक्तींची कार्यालये, व्यायामशाळा, मंदिरे, झोपड्या अशा विविध प्रकारचे हे अतिक्रमण तुटपुंज्या मनुष्यबळावर सिंचन विभागाची अतिक्रमणांविरोधात लढाई

विशाल शिर्के पुणे : मुठा कालव्या लगत केवळ शहराच्या हद्दीतच तब्बल शंभर हेक्टर जमीन अतिक्रमणांनी गिळंकृत केली असल्याचे उघड झाले आहे. असे अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे पाहणी करण्यासाठी गाडी देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच काय तर, मंजुर पदांपैकी अवघ्या ३३ टक्के मनुष्यबळावर त्यांना काम करावे लागत आहे.जलसंपदा विभागाच्या जमिनींनर अतिक्रमण होऊ नये आणि जलसंपदा विभागाच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सिंचन भवन येथे मालमत्ता व्यवस्थापन विभागाची स्थापना सुमारे दीड वर्षांपूर्वी केली. मात्र हा विभाग केवळ उपचारापुरता असल्याचे दिसून येत आहे. या विभागासाठी १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, सध्या अवघ्या ६ व्यक्तींवरच कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. खडकवासला धरणापासून महानगरपालिका हद्दीत तब्बल ३४ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. इतक्या अंतरावरील जमिनीची पाहणी करण्यासाठी मंजुर पदांपैकी केवळ ३३ टक्के पदेच उपलब्ध करुन दिली आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमणांची पाहणी आणि मालमत्तेची देखभाल या साठी या विभागाला गाडी आवश्यक असताना ती दिली गेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्र्वती पायथ्याजवळ झालेल्या कालवाफुटीमुळे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत दांडेकर पूल वसाहत आणि परिसरातील तब्बल ७५९ झोपडपट्ट्यांचे नुकसान झाले आहे. कालव्या शेजारी भूमिगत केबलसाठी झालेल्या खोदाईमुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत ठिकठिकाणी अतिक्रण झाल्याचे समोर आले आहे. काही राजकीय व्यक्तींची कार्यालये, व्यायामशाळा, मंदिरे, झोपड्या अशा विविध प्रकारचे हे अतिक्रमण आहे. पर्वती आणि जनता वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. इतक्या तुटपुंज्या मनुष्यबळावर सिंचन विभागाला अतिक्रमणांविरोधात लढाई करावी लागत आहे. याबाबत मालमत्ता व्यवस्थापन विभागातील उपविभागीय अधिकारी सुनील केदार म्हणाले, सुमारे दीड वर्षांपूर्वी हा विभाग सुरु करण्यात आला आहे. सध्या सहा पदे कार्यरत असून, त्यात २ शाखा अभियंता, २ तांत्रिक सहाय्यक, एक शिपाई आणि एका कारकूनाचा समावेश आहे. या शिवाय विभागाला कामकाजासाठी स्वत:ची गाडी देखील नसल्याचे त्यांनी कबूल केले. ...................

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी