मालमत्तांची माहिती ‘आॅनलाइन’
By Admin | Updated: May 9, 2017 04:16 IST2017-05-09T04:14:32+5:302017-05-09T04:16:37+5:30
कर्ज तारण असलेल्या, गहाण तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या मालमत्तांची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून

मालमत्तांची माहिती ‘आॅनलाइन’
पुणे : कर्ज तारण असलेल्या, गहाण तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या मालमत्तांची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आता ‘आॅनलाइन’ करण्यात येणार आहे. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही आॅनलाइन पाहता येणार असून आगामी काळात मालमत्तांच्या खरेदी-विक्रीसाठी लागणारा ‘सर्च रिपोर्ट’ही आॅनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये जमीन तसेच मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले आहे. मालमत्तांची पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने अनेकदा ग्राहकांना फसवणुकीचा सामना करावा लागतो.
मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी अनेकदा ग्राहकाच्याच खिशाला कात्री लागते. यासोबतच सर्च रिपोर्टही वकिलामार्फत काढावा लागतो. हे काम खर्चिक असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
(प्रतिनिधी)