शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024 : भयमूक्त वातावरणातील मतदानासाठी १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

By नारायण बडगुजर | Updated: November 20, 2024 09:35 IST

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त 

पिंपरी : विधानसभा निवडणूक आणि मतदान प्रक्रिया शांततेत, भयमूक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६२८ जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएस) कायद्याच्या विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज झाले असून चोख बंदोबस्त तैनात केला आहे.  

विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तसेच अवैध धद्यांवर छापे घालून तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवाया करून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर आळा घालण्यात आला. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये एक कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त केली. दारुबंदी अधिनियमानुसार मोठ्या प्रमाणावर छापे घालून एक कोटी १७ लाख रुपयांची दारु जप्त केली. ४९ अग्निशस्त्रे व १०० काडतुसे जप्त केली. ३७ लाख ९३ हजार रुपयांचा गांजा व इतर अंमली पदार्थ जप्त केले. गुन्हेगारीस आळा घालण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएस) कायद्याच्या विविध कलमांखाली १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ प्रमाणे ३४७ जणांवर, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे १३६ लोकांना तडीपार केले. १० गुन्हेगारी टोळ्यांतील ४९ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. ७ आरोपींना स्थानबद्ध केले. ७१ पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली...असा आहे पोलिस बंदोबस्त 

पोलीस सह आयुक्‍त : १अपर आयुक्‍त : १उपायुक्त : ६सहायक आयुक्‍त : ९निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक : ३११पोलिस अंमलदार : ३०९५होमगार्ड : १०००एसआरपीएफ कंपनी : २सीएपीएफ कंपनी : ४

विधानसभा निवडणूक काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे. काही शंका, अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मतदान करताना कोणत्याही मतदारांनी मोबाईल फोन मतदान बूथमध्ये घेऊन जाऊ नये.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024Policeपोलिस