दहशतवादाचा रॅलीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:59 IST2016-01-18T00:59:52+5:302016-01-18T00:59:52+5:30

दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व त्यांच्या कुटुंबियांना उध्वस्त करुन टाकण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ

Prohibition by Terrorist Rally | दहशतवादाचा रॅलीद्वारे निषेध

दहशतवादाचा रॅलीद्वारे निषेध

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व त्यांच्या कुटुंबियांना उध्वस्त करुन टाकण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह पुणेकर नागरिक एकवटले. रविवारी सकाळी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढून दहशतवादाचा निषेध केला. या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावर बैठक घेऊन निषेध रॅलीचे आयोजन केले. रविवारी सकाळी बालगंधर्व चौकामधून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, माजी आमदार मोहन जोशी, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नगरसेवक दीपक मानकर, मनसेचे किशोर शिंदे, हिंदकेसरी अमोल बुचडे सहभागी झाले होते.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition by Terrorist Rally