प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’
By Admin | Updated: October 3, 2014 23:39 IST2014-10-03T23:39:18+5:302014-10-03T23:39:18+5:30
प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक रिक्षाचालकांकडून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’
>पुणो : प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक रिक्षाचालकांकडून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. नियमानुसार रिक्षावर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरचा वापर वाहन एका जागेवर थांबवून करणो आवश्यक आहे. मात्र, अनेक रिक्षा रस्त्यांवरून फिरत बिनधास्तपणो प्रचार करताना दिसत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवाराची प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठी लगबग सुरू आहे. बॅनरबाजी, पदयात्र, दुचाकी फेरी, बैठका, सभा, पत्रके या माध्यमातून प्रचारात रंग भरला जात आहे. याशिवाय रिक्षांद्वारे फिरता प्रचार करण्याकडेही उमेदवारांचा मोठा कल वाढला आहे. रिक्षांवर उमेदवाराचे कटआऊट लावले जाते. पत्रके वाटली जातात. तसेच लाऊडस्पीकरद्वारे उमेदवाराची माहिती, प्रचार, सभांची माहिती दिली जाते. शहरातील छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये जाऊन या रिक्षा दिवसभर फिरता प्रचार करू शकत असल्याने बहुतेक उमेदवार रिक्षाला पहिली पसंती देतात. तसेच, उमेदवारासोबतही या रिक्षांमधून प्रचार केला जातो. उमेदवारांनाही या रिक्षांचा खर्च परवडणारा असतो. त्यामुळे निवडणुकीत रिक्षांचे बुकिंग वाढते.
प्रचारासाठी परवानगी देताना
रिक्षाचालकांना काही सूचना दिल्या जातात. त्यामध्ये एका जागेवर थांबून लाऊडस्पीकरद्वारे प्रचार करण्याचे बंधन घातले जाते. लाऊडस्पीकर सुरू ठेवून फिरता प्रचार करण्यास रिक्षांना नियमानुसार बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सध्या शहरात अनेक रिक्षांमधून लाऊड स्पीकर सुरू ठेवून फिरता प्रचार होताना दिसत आहे. आवाजावरही कुठली मर्यादा नसते. त्यामुळे या आवाजाचा नागरिकांना मात्र त्रस होताना दिसतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)
4प्रत्येक उमेदवाराची प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठी सुरू आहे लगबग.
4शहरातील छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये जाऊन या रिक्षा दिवसभर फिरता प्रचार करू शकत असल्याने, बहुतेक उमेदवारांकडून रिक्षाला पहिली पसंती.
4प्रचारासाठी परवानगी देताना रिक्षा चालकांना काही सूचना दिल्या जातात. त्यामध्ये एका जागेवर थांबून लाऊडस्पीकरद्वारे प्रचार करण्याचे बंधन घातले जाते.
..तर रिक्षांवर कारवाई
लाऊडस्पीकर लावलेल्या रिक्षांनी नियमानुसार एका जागेवर थांबून प्रचार करणो अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने नेमलेल्या फ्लाइंग स्कॉडमार्फत निवडणुकीतील नियमबाह्य गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास फ्लाइंग स्कॉडला माहिती दिली जाते. त्यानंतर कारवाई केली जाते. मात्र, अद्याप कसबा विधानसभा मतदारसंघात अशा एकाही रिक्षावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सोनप्पा यमगर यांनी सांगितले.