‘कुकडी’तून पाणी सोडण्याच्या निर्णयाला १३ मार्चपर्यंत स्थगिती
By Admin | Updated: November 20, 2015 02:53 IST2015-11-20T02:53:24+5:302015-11-20T02:53:24+5:30
कुकडी प्रकल्पातील डिंभे व येडगाव धरणातून दि. १६ नोव्हेंबर रोजी घोड धरणात १.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या निर्णयाला

‘कुकडी’तून पाणी सोडण्याच्या निर्णयाला १३ मार्चपर्यंत स्थगिती
घोडेगाव : कुकडी प्रकल्पातील डिंभे व येडगाव धरणातून दि. १६ नोव्हेंबर रोजी घोड धरणात १.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती देत याची पुढील सुनावणी १३ मार्च २०१६ रोजी ठेवली आहे.
नगर जिल्ह्यातील राजेंद्र नागवडे व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाकडे अपिल करून कुकडी प्रकल्पातून दि. १६ नोव्हेंबर रोजी १.६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश घेतला होता.
या निर्णयाविरोधात आंबेगाव तालुक्यातील देवदत्त निकम यांनी उच्च न्यायालयात अपिल करून हे पाणी सोडल्यास शासनाचे समान पाणीवाटप धोरण होत नाही व हे पाणी उन्हाळ्यासाठी राखून ठेवले जावे, अशी मागणी केली होती. यावर दि. १७ रोजी सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजू पडताळून स्थगितीचा आदेश कायम ठेवत थेट दि. १६ मार्च २०१६ ही पुढची तारीख दिली. त्यामुळे हे १.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय थांबला आहे.