पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध

By Admin | Updated: April 26, 2017 03:53 IST2017-04-26T03:53:12+5:302017-04-26T03:53:12+5:30

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक

The prohibition of Pakistan's work | पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध

पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध

पिंपरी : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला. बंडगार्डने पोलीस स्टेशन चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
भारताने दहशतवादी कसाबला पकडल्यानंतर त्याच्यावर रितसर खटला चालवून पुराव्यानिशी दोषी ठरल्यानंतरच त्याला फाशी देण्यात आले. पण कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने पुरावा नसताना हुकूमशाही पद्धतीने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानची न्यायव्यवस्था सदोष आहे, असा आरोप फाउंडेशनचे प्रितेश गुप्ते, कुंदन लांडगे यांनी केला.
आंदोलनात संपर्कप्रमुख सागर पाडाळे, संजीव अत्रे, मनोज साळवे, राजू शिंदे, विष्णू सोलकर, राहुल कारंडे, रमजान बागवान, केदार शिंदे, प्रकाश सोनवणे, नीलेश हाडके आदी उपस्थित होते. या वेळी परिसरातील नागरिकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी गर्दी करून पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The prohibition of Pakistan's work