शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी देशभक्ती तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले  : अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:55 IST

शिक्के मारण्याची प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे. लेखक म्हणून ही गोष्ट मला फार अस्वस्थ करते..... 

ठळक मुद्देसंगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबददल अभिराम भडकमकर यांचा सत्कार

पुणे : सध्याच्या काळात आपण ग्रे शेड्स मान्य करेनासेच झालो आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टी काळ्या किंवा पांढ-या बघायची सवय लागली आहे. तुमच्याकडे एकतर मोदीभक्त किंवा द्वेष्टे म्हणून बघितले जाते. तुम्ही पुरोगामी तरी असता किंवा प्रतिगामी तरी असता. पण असं असूच शकत नाही. हे सगळे शब्द अतिशय स्वस्त झाले आहेत. कुणी देशभक्ती स्वस्त केली तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले. त्यामुळे आज कलावंताने ठामपणे उभे राहून सांगायची गरज आहे की आम्हाला कुणाकडूनच सर्टिफिकेट नको आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर यांनी समाजातील व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.     यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबददल अभिराम भडकमकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (आयपार) या संस्थेतर्फे करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी भडकमकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. रामगोपाल बजाज, ज्येष्ठ नाट्यचित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक किरण यज्ञोपवीत, आयपारचे संस्थापक संचालक आणि नाट्यदिग्दर्शक प्रसाद वनारसे उपस्थित होते.     अभिराम भडकमकर यांनी विविध एकांकिका, नाटके, चित्रपट तसेच कादंब-या लिहिलेल्या आहेत.या लेखनप्रक्रियेविषयी बोलताना भडकमकर म्हणाले, आम्हाला लिहायचा अधिकार आहे आणि आम्ही लिहिणार असे सांगायची गरज आहे. शिक्के मारण्याची ही प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे. लेखक म्हणून ही गोष्ट मला फार अस्वस्थ करते.     डॉ. श्यामला वनारसे यांनी भडकमकर यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेतला. ‘एका बाजूला वाहतो ही दुर्वांची जुडी’ किंवा ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ यासारखी व्यावसायिक नाटके आणि दुस-या बाजूला संयत अभिनय शैली असलेली वास्तववादी-प्रायोगिक नाटके यांच्यामध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. आणि या तणावाचे निरसन कसे करायचे हा प्रश्न अभिराम भडकमकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवला. बदलत्या समाजातल्या नवीन विचार करू शकणा-या माणसांना जे प्रश्न वारंवार पडत होते त्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणून त्यांना स्वत:चा निर्णय घ्यायला मदत करण्याचं काम भडकमकरांच्या नाटकांनी गंभीरपणे आणि प्रभावीपणे केले असल्याचे त्या म्हणाल्या.    प्रा. रामगोपाल बजाज म्हणाले, मी अभिरामचा शिक्षक होतो. त्यावेळी अभिराम विद्यार्थीदशेतच एक नाटककार, अभिनेता, विचारी असल्याचं आम्हां सर्वांच्या लक्षात आलं होतं. आज माज्या या गुणी विद्याथ्यार्चा सत्कार करताना मला स्वत:चाच गौरव झाल्यासारखं वाटतं आहे. प्रसाद वनारसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यSocialसामाजिक