समाजाची प्रगती स्त्रियांशिवाय अशक्य
By Admin | Updated: March 23, 2015 00:57 IST2015-03-23T00:57:07+5:302015-03-23T00:57:07+5:30
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. जर तिच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी तसेच समाजाने घातलेल्या चौकोटीतून बाहेर काढण्यासाठी तिला आधार दिला पाहिजे.

समाजाची प्रगती स्त्रियांशिवाय अशक्य
पुणे : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. जर तिच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी तसेच समाजाने घातलेल्या चौकोटीतून बाहेर काढण्यासाठी तिला आधार दिला पाहिजे. कारण एक स्त्री शिकली तर कुटुंब सुशिक्षित होते, असे मत तमन्ना शेख-इनामदार यांनी व्यक्त केले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ आयोजित ४५व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मुस्लिम महिलांसमोरील आव्हाने’ या विषयावर त्या अध्यक्षपदावरून रविवारी बोलत होत्या. या वेळी प्रा. हसिना मुल्ला, खातून बी. शेख, सायरा मुलाणी, शहनाज शेख आदी उपस्थित होते.
शेख म्हणाल्या, ‘‘पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आम्ही संरक्षक आहोत या विचाराने तिला पुढचे पाऊल टाकू दिले
जात नाही. महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्री शिक्षणालाही महत्त्व दिले
पाहिजे. महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना त्यांच्यापर्यत पोहोचल्या पाहिजेत.’’
ज्ञानापासून अज्ञान, तलाक, शिक्षण, रोजगार, समाजात वावरत असताना राजकीय, धार्मिक, सामाजिक असे भेडसावणारे अनेक प्रश्न हसिना मुल्ला यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘स्त्रियांनी घराबाहेर पडू नये या गोष्टीला मुस्लिम समाजामध्ये छेद देण्याची गरज आहे. स्त्रियांनी महाविद्यालत पाऊल टाकताच त्यांना विवाहबंधनात न अडकविता त्यांना शिक्षण पूर्ण करू देणे आवश्यक आहे. आधुनिक युगात धार्मिक शिक्षणापेक्षा तांत्रिक शिक्षण देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत. महिलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा अधिकार असला पाहिजे. यासाठी आम्ही काझी बनण्याचे ट्रेनिंग घेत आहोत.
- खातून बी. शेख