शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:59 IST

'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

ठळक मुद्दे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन'काव्य वाचन स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा', 'नाटक स्पर्धा', 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा आदी कार्यक्रम

पुणे : 'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एम. सी. ई. सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख, उपस्थित होते. आझम कॅम्पसतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये 'काव्य वाचन स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा', 'नाटक स्पर्धा', 'मराठी चित्रपट'शो, 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, 'मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा', 'प्रश्नमंजुषा स्पर्धा', 'महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा', सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवार, दि. ९ जानेवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी मातीचे खुले मैदान येथे 'महाराष्ट्रीयन खाद्य मेळाव्या'चे आयोजन, बुधवार, दि. १० जानेवारी 'महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा' असेम्ब्ली हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत, गुरुवार, दि. ११ जानेवारी रोजी आर्ट्स अ‍ॅकॅडमी आवार येथे 'मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा' सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, कनिष्ठ आणि वरिष्ठ गटासाठी 'प्रश्नमंजुषा स्पर्धा' शुक्रवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ग्रीन आॅडिटोरियम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, शनिवार, दि. १३ जानेवारी चिकणमाती आणि कथाकथन सत्र 'ग्रीन आॅडिटोरियम', आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ९ दुपारी १ पर्यंत, सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मराठी संवर्धन पंधरवडा सांगता कार्यक्रम असेम्ब्ली हॉल येथे हॉल होणार आहे. 

टॅग्स :P A Inamdarपी ए इनामदारmarathiमराठीPuneपुणे