वाद्यवृंदाच्या सुरावटींवर रंगला कार्यक्रम
By Admin | Updated: January 23, 2017 03:17 IST2017-01-23T03:17:13+5:302017-01-23T03:17:13+5:30
वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेला नव्या व जुन्या हिंंदी-मराठी गीतांचा ‘अॅन इन्स्ट्रूमेंटल जर्नी’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांची

वाद्यवृंदाच्या सुरावटींवर रंगला कार्यक्रम
पुणे : वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेला नव्या व जुन्या हिंंदी-मराठी गीतांचा ‘अॅन इन्स्ट्रूमेंटल जर्नी’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांची दाद मिळवून गेला.
‘म्युझिकल डिव्हाइन’ या गिटार व सिंंथेसायझर विद्यालयाच्या सुमारे तीस विद्यार्थ्यांचा या वाद्यवृंदात समावेश होता. गिटार, सिंंथेसायझर, बासरी या वाद्यांवर सादर झालेल्या ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन, आर. डी. बर्मन, बाप्पी लाहिरी ते शंकर एहसान लॉय तसेच चिनार-महेश व अजय-अतुल यांच्या सैराटमधील गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला.
वाद्यवृंदाच्या समूह आविष्कारातून साकारलेल्या टायटन सिंफनीचा आविष्कार विलक्षण होता. राष्ट्रगीताच्या समूहवादनातून देशाच्या सीमारक्षण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ वादक अभिजित भदे, विजू मूर्ती, पराग पांडव, सचिन वाघमारे, अनिल करमरकर, तसेच धवल चांदवडकर अशा दिग्गज कलावंतांचाही कार्यक्रमात सहभाग होता. ज्येष्ठ संगीत संयोजक विवेक परांजपे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. संदीप पाटील यांनी निवेदन केले.
(प्रतिनिधी)