शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अकादमी पुरस्कारासाठी पुण्यातील प्रा. शैलजा बापट यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 22:27 IST

साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

पुणे : साहित्य अकादमीतर्फे अभिजात वाडमय आणि संशोधनपर लेखनासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी संस्कृत भाषा-वाडमयाच्या तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा.शैलजा बापट यांची निवड झाली आहे. एक लाख रुपए, ताम्रपट आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ’ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ या संशोधनपर ग्रंथासाठी 2017-18 या वर्षीच्या

साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. अनेक हस्तलिखितांचा अभ्यासातून बापट यांनी ‘ब्रह्मसूत्र’ या ग्रंथांची तीन खंडांमध्ये निर्मिती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संस्कृत विषयाचे अध्यापन करण्याबरोबरच विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. 2009 मध्ये त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) शिष्यवृत्ती मिळाली होती.  बापट यांनी शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांत याविषयावरही पुस्तके लिहिली आहेत. आजवर केलेल्या कामाची दखल घेतल्यामुळे या पुरस्काराचे महत्व खूप आहे, या कामामुळे महानुभव आणि मराठी भाषेकडे वळले असल्याची भावना प्रा.शैलजा बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 1998 साली पुणे विद्यापीठात कार्यरत असताना ‘ब्रम्हसूत्र’ प्रकल्पाचे काम हाती घेतले. न्यू भारतीय बुक कापोर्रेशन या संस्थेने तीन खंडामध्ये आणि इंग्रजी भाषेत हा ग्रंथ 2011 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ब्रह्मसूत्र हे वेदांत तत्वज्ञानाचे मुलभूत सूत्रवाडमय आहे. उपनिषदे, ब्रम्हसूत्र आणि भगवदगीता ही तिन्ही वेदांतदर्शनाची मुख्य  प्रस्थाने आहेत. ब्रम्हसूत्रांचा मूळ पाठ कोणता हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आद्य शंकराचार्य यांच्यासह दहा आचार्यांचे भाष्य ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे