वाल्हे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST2021-08-25T04:16:00+5:302021-08-25T04:16:00+5:30
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात ...

वाल्हे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून, सर्वत्र त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. वाल्हे येथे नीरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटातील सदस्या शालिनी पवार यांच्या उपस्थितीत, बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, महाराजांना अभिवादन करून, शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, वागदरवाडी सरपंच उषा पवार, उद्योजक राहुल यादव, सागर भुजबळ, विनोद पवार, प्रदीप चव्हाण, सुरेश पवार, विजयसिंह पवार, सुधाकर पवार, दीपक पवार यांसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.