शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या कार्यअहवालाच्या कार्यक्रमात स्वपक्षीयांची कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 04:34 IST

‘शिवाजीनगर’मधील खदखद आली बाहेर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर मतदारसंघामधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरु असलेली धुसपुस अखेर आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाहेर पडली़ भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणणाºया काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात आमदारांच्या विरोधात फलक फडकावून घोषणाबाजी केली़ तसेच गॅलरीतून पत्रके हवेत भिरकाविली़ या मुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ निर्माण झाला़ अखेर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचेही न ऐकता कार्यकर्ते घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर निघून गेले़ भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडत पत्रके भिरकाविली.

शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन कार्यक्रम बुधवारी सायंकाळी घोले रोडवरील नेहरु सभागृहात आयोजित करण्यात आला होता़ नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सायंकाळी ५ वाजताचा कार्यक्रम प्रत्यक्षात साडेसहा वाजता सुरु झाला़ कार्यक्रम सुरु झाल्यानंतर आमदार विजय काळे हे बोलण्यासाठी उभे राहताच सभागृहाच्या वरच्या भागात बसलेले कार्यकर्ते उठले व त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली़ त्यांनी एक फलकही फडकाविला़त्यावर ‘ज्या कार्यकर्त्यांनी केले तुम्हाला आमदार त्या कार्यकर्त्यांची लावली वाट आता तेच कार्यकर्ते तुम्हाला दाखवणार कात्रजचा घाट’ असा मजकूर लिहिलेला होता़ हे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते़ काही वेळ घोषणाबाजी करुन सभागृहात पत्रके भिरकावून हे कार्यकर्ते बाहेर निघून गेले़ त्यानंतर कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ पार पडला़

आमदारांच्या कार्यक्रमात त्यांच्याविरोधात झालेल्या घोषणाबाजीचे व्हिडिओ तातडीने व्हायरल होऊ लागले़ त्यामुळे त्याची शहरभर एकच चर्चा सुरु झाली आहे़ विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी केल्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे़ शिवाजीनगर मतदारसंघातून अनेक जण इच्छुक असून त्यांच्यातील रस्सीखेचीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते़

टॅग्स :BJPभाजपा