दावडीत मिरवणूक, पैसे उधळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:01+5:302021-02-27T04:15:01+5:30
संतोष गुलाब लोणकर (वय ४२), राहुल राजाराम कान्हुरकर, सागर काळूराम बोत्रे (वय ३२), भानुदास तुकाराम खेसे (वय ...

दावडीत मिरवणूक, पैसे उधळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
संतोष गुलाब लोणकर (वय ४२), राहुल राजाराम कान्हुरकर, सागर काळूराम बोत्रे (वय ३२), भानुदास तुकाराम खेसे (वय २७), सुधीर साहेबराव गाडगे (वय २९), युवराज मारुती बोत्रे (वय २८, सर्व रा. दावडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावडी गावात सरपंच, उपसरपंचाची मिरवणूक ग्रामस्थांनी काढली होती. दरम्यान संतोष गुलाब लोणकर यांनी मिरवणुकीमध्ये पैसे उधळले. यावेळी निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी नेमेले होते. मात्र, मिरवणूक चालू होताच पोलीस गायब झाले होते. सोशल मीडियावर पैसे उधळणे हा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी दावडी येथील पोलीस पाटील व बीट अंमलदार कुठे होते यांची चौकशी करून पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.