शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण ; काँग्रेस नेत्यांशी पोलिसांची हुज्जत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 12:21 IST

नेत्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यावरून एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना टोकले.

पुणे : काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, पुण्याचे उमेदवार मोहन जोशी आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी वाद घातल्यामुळे सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदे हायस्कुल येथील मतदान केंद्रावर जोशी आणि रणपिसे मतदार केंद्रांची पाहणी करत फिरत असताना आले होते. तेथे ज्येष्ठ नेते उल्हास पवार रांगेत उभे होते. या तिघांचे बोलणे सुरू असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यावरून एका महिला पोलीस उपनिरीक्षकांने त्यांना टोकले. कार्यकर्त्यांचा फोन जप्त करण्यात आला. त्यामुळे रणपिसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिका पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी त्यांचा वाद झाला. संबंधीत उपनिरीक्षकाने रणपिसे यांना असले एमएलए फिमेले मी ओळखत नाही असे म्हटल्याने वातावरण गंभीर झाले होते. आमदार रणपिसे यांनी यावरून हक्कभंग होऊ शकतो असे सांगत पोलिसांची दडपशाही चुकीची असल्याचे म्हटले. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेत सामोपचारने दोघांची समजूत काढली. मात्र, या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांचा जप्त करण्यात आलेला मोबाईल फोटो डिलीट करून परत करण्यात आला.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणPoliceपोलिसVotingमतदान