मोहन जोशी यांच्या अडचणी वाढणार

By Admin | Updated: December 13, 2014 23:50 IST2014-12-13T23:50:39+5:302014-12-13T23:50:39+5:30

नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची आज (रविवार) मुंबईत होणारी सर्वसाधारण बैठक बेळगावच्याच मुद्यावर गाजणार

The problems of Mohan Joshi will increase | मोहन जोशी यांच्या अडचणी वाढणार

मोहन जोशी यांच्या अडचणी वाढणार

पुणो :  नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची आज (रविवार) मुंबईत होणारी सर्वसाधारण बैठक  बेळगावच्याच मुद्यावर गाजणार असून, मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना बेळगाव सीमाप्रश्नावरील  बेजबाबदार विधानाबाबत सदस्यांकडून धारेवर धरले जाणार आहे. यासाठी सदस्यांनी जय्यत तयारी केली असून, जोशी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 
बेळगाव येथे होत असलेल्या नाटय़ संमेलनाच्या व्यासपीठावर सीमाप्रश्नासंदर्भात  ठराव केला जाणार नाही. बेळगावला फारसे जात नसल्याने तेथील परिस्थितीची काही माहिती नाही, असे वक्तव्य करून मोहन जोशी यांनी वादाची ठिणगी पाडली, त्यामुळे केवळ सीमावासीयांच्या नव्हे, तर मराठी भाषकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. मात्र, जोशी यांनी जाहीरपणो माफी मागून वातावरण शमविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
 
4पंढरपूरच्या नाटय़ संमेलनात आगामी संमेलन  बेळगावमध्ये घेण्यात यावे, या मागणीने चांगलाच जोर धरला होता. येळ्ळूरमध्ये मराठी भाषकांवर झालेल्या अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर नाटय़ कलावंतांनी निषेध मोर्चाही काढला होता. स्वत: अध्यक्ष मोहन जोशी यांनी संमेलन बेळगावमध्ये घेण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र, त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे संमेलनाचे आयोजक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आजच्या बैठकीत बेळगावमध्ये संमेलन घ्यायचे का नाही? यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 
बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. आम्ही मराठी भाषकांच्याच नेहमी बाजूने उभे राहिलो आहोत. त्यामुळे जोशी यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. याचा जाब त्यांना विचारला जाईल. संमेलन जर झाले नाही, तर आम्ही बेळगावात जाऊन आंदोलन करू.
- सुनील महाजन, सदस्य नियामक मंडळ
बेळगावमध्ये मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाच्या पाश्र्वभूमीवर नाटय़ कलावंतांनी काढलेल्या मोर्चाला जोशी यांचा पाठिंबा होता. त्यामुळे तेथील परिस्थिती मला माहीत नाही, या जोशी यांच्या विधानात कोणतेही तथ्य नाही.- योगेश सोमण, दिग्दर्शक 
 

 

Web Title: The problems of Mohan Joshi will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.