समस्या तुमची, उपाय गुरुजींचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST2021-04-02T04:10:35+5:302021-04-02T04:10:35+5:30

शनिवार, ३ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जीवन जगत असताना अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा ...

The problem is yours, Guruji's solution | समस्या तुमची, उपाय गुरुजींचे

समस्या तुमची, उपाय गुरुजींचे

शनिवार, ३ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जीवन जगत असताना अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकालाच समस्यांना तोंड द्यावे लागते. जीवनात आनंद, भरभराट आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही नियम ज्योतिष शास्त्राची शाखा असणाऱ्या वास्तूशास्त्र अभ्यासाद्वारे बनवले गेले आहेत. त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नसून तुमच्या समस्यांवर उपाय मिळणार आहेत. ते फक्त ‘लोकमत इव्हेंटफुल’ पेजवर.

वास्तुशास्त्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक घरांमध्ये वास्तूदोष आढळतात. यावेळी, अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या घरातही असे काही वास्तूदोष असल्यास उपाय करून त्यावर मात करता येते. तसेच आयुष्यातील ‘लकी नंबर’ देखील आपले नशीब बदलवतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी दैवी व आध्यात्मिक उपाय, विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी कधीही न बघितलेला करियर रिपोर्ट, ग्रहांचे दोष दूर करणे, डाऊझिंग म्हणजे काय? या व आशा अनेक समस्यांची उत्तरे आता आपल्याला मिळणार आहेत ते म्हणजे लोलक शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र बर्वे यांच्या सखोल मार्गदर्शनातून. तुमची समस्या दूर करण्यासाठी व आनंदाने जीवन जगण्यासाठी आणि समस्यांवरील उपाय जाणून घेण्यासाठी नक्की लाइव्ह या. येत्या शनिवारी (दि.३) संध्याकाळी पाच वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.

Web Title: The problem is yours, Guruji's solution