आव्हाळवाडीत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: February 23, 2017 03:22 IST2017-02-23T03:22:02+5:302017-02-23T03:22:02+5:30
आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा

आव्हाळवाडीत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
आव्हाळवाडी : आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा नसल्याने हे पाणी गावाच्याजवळ सोडून दिले आहे. तेथे राहणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत असल्याने व येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याची दुर्गंधी येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावाचा सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आव्हाळवाडी गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करून शासनाकडून पुरस्कार मिळाला आणि सरपंचपद हे सहा महिने, नऊ महिने ठेवून विकास कमी झाला. सांडपाण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
सांडपाणी सोडण्याचा प्रश्न वाढू लागला, सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि डेंगी, मलेरिया, थंडीताप असे आजार होत असल्याने ग्रामपंचायतीने अंदाजे ५० लाख खर्च करून बंदिस्त गटार व सिमेंट रस्ते तयार केले, गटारामधून सांडपाणी गावच्या खालच्या बाजूला रस्त्याच्या बाजूने पाट करून सोडण्यात आले. या ठिकाणी गावाच्या वरच्या भागापर्यंत ९.५० मीटर पाईपलाईन शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होईल, या उद्देशाने केली. काही शेतकऱ्यांनी वापर केला, तर काहींनी शेतकऱ्यांची
अडवणूक केली.
सांडपाणी पुढे जात नसल्याने ते तेथेच राहिल्याने तेथील बाजूला राहणारे नागरिक व येणारे-जाणारे वाहनचालक व पायी चालणारे नागरिक नाक दाबून जात आहेत. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे असे म्हणायचे का? हा प्रश्न कधी सुटणार? असे येथील नागरिक बोलत आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून तसाच राहिला आहे. (वार्ताहर)
पाणी साचल्याने जाते बोअरिंगमध्ये
आव्हाळवाडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे यांनी या पाण्यावर काही महिने मका हे पीक घेऊन गुरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविला. यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाण्याचा वापर होत गेला. आता हे पाणी त्यांनी त्यांच्या शेतात बंद केल्याने ते पुढे जात नसल्याने तेथेच साचून आजूबाजूच्या बोअरिंगमध्ये जाते. हेच पाणी कामासाठी व पिण्यासाठी लोक वापरत आहेत.