पॉलिहाऊसधारक शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: January 19, 2015 23:23 IST2015-01-19T23:23:25+5:302015-01-19T23:23:25+5:30
उच्च तंत्रज्ञानाची वापर असणारी कमी जागेत कमी पाण्यात पिकांना दर्जेदार गरजेप्रमाणे वातावरण देणारी फायदेशीर शेती म्हण्ून महाराष्ट्रातील शेतकरी पॉलिहाऊस शेतीकडे वळला आहे.

पॉलिहाऊसधारक शेतकरी अडचणीत
रांजणगाव सांडस : उच्च तंत्रज्ञानाची वापर असणारी कमी जागेत कमी पाण्यात पिकांना दर्जेदार गरजेप्रमाणे वातावरण देणारी फायदेशीर शेती म्हण्ून महाराष्ट्रातील शेतकरी पॉलिहाऊस शेतीकडे वळला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे.
यामध्ये सुशिक्षित तरूण, महिला वर्ग, शेतकरी त्यामध्ये आधुनिक शेतीप्रयोग राबवित आहे. परंतु ही शेती करताना शेतकऱ्यांना बँक कर्ज, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई शासनाचे या बाबत असणारे धोरण, त्यामुळे पॉलिहाऊस शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.
महाराष्ट्रातील हजारो पॉलिहाऊस शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. या समस्यातून मार्ग काढण्यासाठी भूमाता पॉलिहाऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी आयुक्तालयामार्फत प्रस्ताव तयार करून शासनास सादर केलेला आहे.
या संदर्भात भूमाता पॉलिहाऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाती टेमघिरे, हुसेन शेख, मकरंद जुनवणे आदी सहकाऱ्यांनी या संदर्भातील निवेदन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही दिलेले आहे.
मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील असे पॉलिहाऊस धारकांना विश्वास वाटत आहे. (वार्ताहर)