शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Pro Kabaddi League : जयपूरचा गुजरातवर सहज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:45 IST

मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.

पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत खोलवर चढायांच्या जोरावर जयपुर पिंक पँथर्स संघाने गुजरात जाएंट्स संघाचा ४२-२९ असा सहज पराभव करून या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात व जयपूर या दोन्ही संघांची आजपर्यंतची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरातने १७ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले आहेत. याचबरोबर जयपुरला देखील फारशी चमकदार कामगिरी करता आली. त्यांनी १७ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळेच या दोन्ही कमकुवत संघांमध्ये आज कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.सुरुवातीपासूनच जयपूरने आघाडी घेतली होती. आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदवीत १३-५ अशी आघाडी मिळविली. गुजरात संघाच्या खेळाडूंनी ही पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला जयपूरकडे १७-८ अशी आघाडी होती. पंधराव्या मिनिटाला त्यांनी दहा गुणांची आघाडी मिळवली होती. जयपूरच्या भक्कम बचावतंत्रापुढे गुजरातच्या चढाईपटूंच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना जयपूरने आणखी एक लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २६-१४ अशी आघाडी होती.उत्तरार्धात सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर ३४-२१ असा आघाडीवर होता. पाच मिनिटे बाकी असताना जयपूरने ३८-२६ अशी आघाडी टिकवत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. जयपूरच्या विजयात अर्जुन देशवाल, नीरज नरवाल यांनी केलेल्या चढायांचा मोठा वाटा होता. गुजरातकडून सुपररेड टाकणारा गुमान सिंग व राकेश यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू फारशी चमक दाखवू शकला नाही.

बंगालची बंगळुरूवर मात

सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवत बंगाल संघाने बंगळुरूवर ४४-२९ अशी मात केली आणि प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या. पूर्वार्धात बंगाल संघाकडे २२-१२ आघाडी होती. बंगालने बंगळुरू विरुद्ध हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत सुरुवातीपासून रणनीती अमलात आणली. सुरुवातीपासून आघाडी घेत त्यांनी सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला पहिला लोण नोंदविला. मध्यंतराला त्यांनी २२-१२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही बंगालच्या खेळाडूंनी खेळावर नियंत्रण मिळवले. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण नोंदवित ३३-१९ अशी आघाडी मिळविली. शेवटची चार मिनिटे बाकी असताना बंगाल संघाकडे ३९-२६ अशी मोठी आघाडी होती.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKabaddiकबड्डीPro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगMaharashtraमहाराष्ट्र