शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पारितोषिक विजेत्या एकांकिकांची प्रेक्षकांसाठी मेजवानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:09 IST

अभिनेता क्षितीश दाते दिग्दर्शित प्राणिमात्र एकांकिकेने २०१२ साली पुरुषोत्तम करंडक पटकावला होता...

ठळक मुद्देदाजीकाका गाडगीळ करंडक, लोकांकिका, सवाई, अशा स्पर्धेत प्रथम स्थान

पुणे: पुरुषोत्तम, सवाई, उत्तुंग, प्रबोधन, दाजीकाका गाडगीळ करंडक अशा सांघिक पारितोषिकासहित चाळीस वैयक्तिक पारितोषिके विजेत्या ' प्राणिमात्र ' आणि '३०० मिसिंग' या दोन एकांकिकांच्या प्रयोगांची मेजवानी प्रेक्षकांसाठी पाहावयास मिळणार आहेत. भरत नाट्य मंदिर येथे येत्या रविवारी (दि. १३ ) रात्री ९.३० वाजता हे प्रयोग सादर होणार आहेत. अभिनेता क्षितीश दाते दिग्दर्शित प्राणिमात्र एकांकिकेने २०१२ साली पुरुषोत्तम करंडक पटकावला होता. त्यानंतर उत्तुंग, प्रबोधन, अशा स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला आहे. तर दिग्दर्शन, अभिनय, काकाजी, सर्वोत्कृष्ट लाईट्स, म्युजिक, नैपथ्य अशी २१ वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत. यश रुईकर दिग्दर्शित एका परदेशी चित्रपटाच्या जादूगाराची कथा उलघडून दाखवणारे '३०० मिसिंग ' या एकांकिकेने २०१६ साली पुरुषोत्तम करंडक मिळवला होता. त्याबरोबरच दाजीकाका गाडगीळ करंडक, लोकांकिका, सवाई, अशा स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले आहे. दिग्दर्शन, अभिनय अशी  २० वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत. आम्ही सात वषार्पूर्वी एक वेगळ्या पद्धतीचे नाटक बसवण्याचा प्रयन्त केला. तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. प्राणिमात्र असे त्या नाटकाचे नाव. प्राणिमात्र हे माझ्यासाठी आणि आमच्या या संपूर्ण संघासाठीच आयुष्यातल एक महत्वाचं वळण आहे. २०१२ साली पुरुषोत्तम करंडक जिंकलेल्या या एकांकिकेला सात वर्षे झाली. शेवटचा प्रयोग करून अडीच वर्षे झाली. तरी तीच टीम उत्साहाने नाटक करण्यास सज्ज आहे. प्राणिमात्र हे मी आयुष्यात दिग्दर्शित केलेले आणि प्रणव बापट याने लिखाण केलेले पहिले नाटक आहे. आमच्या टीममधल्या कलाकारांचा उत्साह पाहता पुन्हा नाटक करण्यास तयार झालो आहे.  क्षितीश दाते, अभिनेता, दिग्दर्शक 

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटक