क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धेचा बक्षीस समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST2021-04-02T04:10:15+5:302021-04-02T04:10:15+5:30

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा २०२१ चा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे ...

Prize ceremony of Krantijyoti Savitribai Phule competition | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धेचा बक्षीस समारंभ

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धेचा बक्षीस समारंभ

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा २०२१ चा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाला़ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने भन्नाट शाळा उपक्रमांतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली.

१० मार्च रोजी झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक निकिता सांडसे पटकावला आहे़ या बक्षीस वितरण समारंभात निकिताने सावित्रीबाईंवरील एकपात्री प्रयोग सादर केला. तर अपेक्षा खिलारी हिने सावित्रीबाईंच्या वेषात येऊन त्यांच्यावरील स्वरचित कविता सादर केली. यावेळी शिक्षक गटात मनीषा केंजळे व आसावरी गुमास्ते यांना गौरविले. तसेच जास्तीत जास्त संख्येने ज्या शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले अशा पाच शाळांच्या मुख्याध्यापकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला़

फोटो - महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा २०२१ चा बक्षीस वितरण करण्यात आले.

(फोटो - सावित्रीबाई फुले प्रोग्रॅम नावाने आहे.)

Web Title: Prize ceremony of Krantijyoti Savitribai Phule competition