शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

प्रियंका जाेशी यांचा ब्रिटनच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 18:11 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. याबरोबरच प्रियंका यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने "अंडर ३०, सायन्स अँड हेल्थकेअर’ या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या तरुणांच्या (३० वर्षांखालील) यादीमध्ये प्रियंका यांचा समावेश करुन नुकताच त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव केला होता. प्रियंका यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली होती.    प्रियंका यांच्या संशोधनामुळे मानवी मेंदूतील लहान रेणूंच्या औषधे आणि चयापचय्यांना ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. अलझायमर्स रोगाचे मूळ कारण समजले जाणारे अमाइलॉइड बीटा प्रथिने क्लंप तयार होण्याशी या प्रक्रियेचा निकटचा संबंध आहे. या संशोधनांतर्गत त्यांनी लहान रेणुंचा साठा (मॉलिक्युल लायब्ररी) तयार केली. यामधून केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील औषध तयार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संशोधनास बळ मिळाले.

"फोर्ब्स मासिकाने विज्ञान क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या तरुण चेहऱयांपैकी एक असा प्रियंकाचा गौरव केला तेव्हा तिची नुकतीच कुठे पीएच. डी झाली होती. सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फ़ेलो म्हणून कार्यरत असलेल्या प्रियंकाने अल्झायमर्स आजारावरील संशोधनामध्ये आघाडी घेतली आहे. मेंदुविषयक आजारांसंदर्भात प्रियंकाने तयार केलेली ’मॉलिक्यूल लायब्ररी’ हे असामान्य संशोधन म्हणून वाखाणण्यात आले आहे. ’डिमेंशिया’मुळे इंग्लंड व वेल्समधील महिलांच्या होणाऱ्या मुत्युंचे प्रमाण वाढत असताना प्रियंकाचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,” अशा शब्दांत ‘बायोकेमिस्ट’ प्रियंकास व्होगने गौरविले आहे.

व्होगने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जुलैतील अंकासाठीच्या मुखपृष्ठावर प्रियंका यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. व्होगने या यादीत हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीमालिकेच्या लेखिका जेके रोलिंग यांनाही स्थान दिले आहे. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकPune universityपुणे विद्यापीठEnglandइंग्लंड