शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

खासगी क्लासेसची ‘चांदी’

By admin | Updated: September 1, 2015 04:15 IST

इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा आणि केवळ सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा शासनाने

पुणे : इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा आणि केवळ सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय खासगी क्लासचालकांच्या पथ्यावर पडला आहे. परिणामी, सीईटी क्लासचालकांच्या वार्षिक उलाढालीत चांगलीच वाढ होणार आहे. तर, जेईई क्लासचालकांकडे येणाऱ्या विद्यार्थी संख्येत निम्म्याने घाट झालेली दिसून येईल.पुणे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे आणि खासगी क्लास चालकांचा करार झालेला आहे. त्यामुळे विज्ञान शाखेस प्रवेश घेणारे बहुतेक सर्वच विद्यार्थी खासगी क्लासमध्ये शिकवणी घेतात. गेल्या दोन वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमास जेईई परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जात होते. मात्र, येत्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून एमएचटी-सीईटीनुसार प्रवेश दिले जाणार असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. सध्या नामांकित क्लासकडून अकरावी, बारावी आणि सीईटी परीक्षेच्या शिकवणीसाठी ८० हजार रुपये आकारले जातात. तर, बारावी आणि सीईटीच्या मार्गदर्शानासाठी ३० ते ५० हजार रुपये शुल्क घेतले जाते. परंतु,केवळ सीईटीच्या गुणांवरच सर्व अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार आहेत. परिणामी, सीईटी क्लास चालकांच्या उलाढालीत चांगलीच वाढ होणार आहे.विविध प्रवेशपूर्व परीक्षांचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, की पुणे शहरात सध्या ४०० ते ५०० अधिकृत खासगी क्लासचालक आहेत. त्यातील काही क्लासचे शुल्क एक ते दीड लाखांपर्यंत आहे. तर, बहुतेक क्लासचे शुल्क ५० ते ८० हजार रुपये आहे.याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी अनधिकृतपणे गल्ली-बोळात क्लास सुरू केले आहेत. या क्लाससाठी विद्यार्थ्यांना २० ते ३० हजार रुपये शुल्क भरावे लागते. तर, अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३२ हजार आहे.खासगी क्लासचालकांनी या ३२ हजार विद्यार्थ्यांकडून सरासरी ५० हजार शुल्क आकारले, तरी त्यांंची आर्थिक उलाढाल तब्बल १६० कोटींवर जाते. एकाच सीईटीच्या निर्णयामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशाचे मार्गदर्शन करणाऱ्या क्लासचालकांची संख्या १० ते १५ आहे. मागील वर्षी या क्लासमध्ये सुमारे २५०० ते ३००० विद्यार्थी शिकवणी घेत होते. यंदा ही संख्या एक ते दीड हजारावर येण्याची शक्यता आहे.परिणामी, सीईटी क्लास चालकांचा फायदा, तर जेईई क्लास चालकांचा तोटा होणार आहे.