खासगी बसला अपघात; पंधरा प्रवासी जखमी
By Admin | Updated: December 23, 2016 00:02 IST2016-12-23T00:02:04+5:302016-12-23T00:02:04+5:30
रावणगाव (ता. दौंड) येथील हद्दीमधील स्वामी चिंचोली येथील परिसरातील गुणवरेवस्तीजवळ सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या

खासगी बसला अपघात; पंधरा प्रवासी जखमी
कुरकुंभ : रावणगाव (ता. दौंड) येथील हद्दीमधील स्वामी चिंचोली येथील परिसरातील गुणवरेवस्तीजवळ सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पुष्कराज ट्रॅव्हल्सच्या (एमएच १२ एफसी ३६०७) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या रुग्णांवर भिगवण, बारामती, पुणे, दौंड येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्व प्रवासी तुळजापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांना प्रवासी वाहतूक असल्याचादेखील विसर पडत आहे. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांनी चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिदास घोलप व हवालदार विठ्ठल खामगळ तपास करीत आहेत.(वार्ताहर)