शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पुणे शहरातील पार्किंग प्रश्न सोडवतील खासगी इमारती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:29 IST

महापालिकेकडून पार्किंग धोरण तयार करून सर्व रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी पे अँड पार्कचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

ठळक मुद्देमहापालिकेने मॉल्समध्ये मोफत पार्किंगचा निर्णय केला जाहीर खासगी इमारतींमध्ये पार्किंग करण्याबाबतचा पार्किंग धोरणामध्ये नाही समावेश

पुणे : झपाट्याने वाढत असलेल्या वाहन संख्येमुळे शहरातील पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग फुल्ल असते. परिणामी नो पार्किंग भागात वाहने लावण्याचे प्रमाणही अधिक आहे. वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शहरातील खासगी रहिवासी इमारतींमध्ये ''पे अँड पार्क ''चा पर्याय पुढे आला आहे. शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये दुपारच्या वेळी पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकते. याठिकाणी पार्किंगला मान्यता मिळाल्यास पार्किंगचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.          महापालिकेकडून पार्किंग धोरण तयार करून सर्व रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी पे अँड पार्कचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. या धोरणामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा समावेश आहे. त्यातच आता महापालिकेने मॉल्समध्ये मोफत पार्किंगचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय धोरणविरोधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पार्किंग धोरणालाही अनेकांनी विरोध केल्याने त्याची अंमलबजावणी लवकर होणे सध्यातरी शक्य दिसत नाही. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासगी इमारतींमध्ये पार्किंगला मान्यता देण्याबाबत काहींनी आग्रही भुमिका घेतली आहे.शहरामध्ये अनेक रुग्णालये, महाविद्यालये, मोठी दुकाने, कार्यालये, अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे त्यामुळे तिथे येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. तिथेही जागा अपुरी पडत असल्याने पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. तर दुसरीकडे शहरात अनेक मोठ्या रहिवासी इमारती आहेत. त्यामुळे मुबलक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध असते. दिवसभर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहने बाहेर नेली जातात. त्यामुळे पार्किंगसाठी सहज जागा उपलब्ध होऊ शकते. अन्य भागातून या परिसरात येणाऱ्यांची वाहने काही कालावधीसाठी इमारतींमध्ये उभी केली जाऊ शकतात. या सोसायट्यांमध्ये पे पार्क अँड चा पर्याय पुढे केल्यास पार्किंग प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल तसेच सोसायट्यांनाही आर्थिक फायदा होईल. महापालिकेकडून त्यासाठी नियमावली तयार करावी लागेल. काही देशांमध्ये ही कल्पना राबविली जात आहे, असे वाहतुक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी सांगितले...............खासगी इमारतींमध्ये पार्किंग करण्याबाबतचा समावेश पार्किंग धोरणामध्ये नाही. जिथे पार्किंगचा प्रश्न आहे, अशा मोठ्या शहरांमध्ये ही कल्पना राबविली जाते. मुंबईत नरिमन पॉईंट भागात सोसायट्यांमध्ये पार्किंग होते. पण पुण्याच्या विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल)मध्ये खासगी इमारतींमध्ये पे अँड पार्किंग चा नियम नाही. त्यामुळे महापालिकेकडून त्याला मान्यता दिली जाणार नाही. याबाबतचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागेल. डी. सी.रूलमध्ये तसा बदल करावा लागेल.- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प अधिकारी, पुणे महापालिका..

.........

ही कल्पना राबवावीडेक्कन जिमखाना भागातील गुप्ते हॉस्पीटलला पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागते. रुग्णालयाकडून रुग्ण, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. पण अनेकदा ती अपुरी पडते. त्यामुळे लगतच्या रस्त्यांवर पार्किंग करावी लागते. रुग्णालय फर्ग्युसन रस्त्यालगत असल्याने तिथे येणाऱ्यांची वाहने अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जातात. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावते. रुग्णालय परिसरामध्ये एका इमारतीचे मैदान आहे. एका बँकेचीही पुरेशी जागा आहे. तिथे ठराविक दिवशी किंवा ठराविक वेळेत पार्किंगसाठी जागा मिळू शकते. अनेकांना पार्किंगचा प्रश्न भेडसावतो. त्यादृष्टीने ही कल्पना चांगली आहे. त्यासाठी रुग्णालयही तयार असून त्याला मान्यता मिळायला हवी. अनेकजण यामध्ये सहभागी होतील. स्वतंत्र अँप बनविल्यास त्यावर उपलब्ध जागांची माहितीही मिळू शकेल, असे रुग्णालयाचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर नितीन गुप्ते यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगTrafficवाहतूक कोंडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका