मसापची गोपनीयता सोशल मीडियावर
By Admin | Updated: March 22, 2017 03:28 IST2017-03-22T03:28:29+5:302017-03-22T03:28:29+5:30
एखाद्या विशिष्ट उपक्रमासाठी समीक्षक म्हणून निवड होणे ही खूप जबाबदारीची गोष्ट असते. मात्र, जर समीक्षकानेच उत्साहाच्या

मसापची गोपनीयता सोशल मीडियावर
पुणे : एखाद्या विशिष्ट उपक्रमासाठी समीक्षक म्हणून निवड होणे ही खूप जबाबदारीची गोष्ट असते. मात्र, जर समीक्षकानेच उत्साहाच्या भरात आपल्या समीक्षक निवडीबाबतची जाहीर घोषणा केली तर हा नक्कीच औचित्याचा भंग ठरतो. असाच काहीसा प्रताप एका पदाधिकाऱ्याच्या विशेष मर्जीतील सदस्याने करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गोपनीयतेलाच ‘चपराक’ दिली आहे. समीक्षकाचे नाव अशा पद्धतीने जाहीर झाल्यास परीक्षण निष्पक्षपातीपणे होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
आयुष्यात एखादा पुरस्कार मिळाला, कुठे सत्कार झाला किंवा एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले तर हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नेटिझन्सकडून सोशल मीडियावर माहिती शेअर केली जाते. त्यानंतर मग लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. ते पाहून शेअर करणाऱ्या नेटिझन्सच्या मनात नक्कीच समाधानाची भावना येते. परंतु एखाद्या स्पर्धेच्या किंवा महत्वाच्या उपक्रमासाठी परीक्षक म्हणून आपली निवड झाली असल्याचे सोशल मीडियावर कधी कुणी टाकल्याचे पाहिले आहे का? मात्र साहित्य वर्तुळात लेखक आणि कवी म्हणून परिचित असलेल्या आणि साप्ताहिकातून साहित्यिक घडामोडीचा वेध घेणाऱ्या एका मसापच्या सदस्यानेच उत्साहाच्या भरात आपली वार्षिक ग्रंथ पारितोषिकासाठी ‘समीक्षक’ म्हणून निवड झाली असल्याची केवळ घोषणाच केली नाही, तर मसापकडून निवड झालेले पत्रदेखील सोशल मीडियावर टाकण्याचा प्रताप केला.
(प्रतिनिधी)