शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचाऱ्यांना कैद्यांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:04 IST

चांगल्या वर्तनुकीचे दाेनशेहून अधिक कैदी हे कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात.

राहुल गायकवाड पुणे : रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडताे अाणि संपूर्ण अायुष्य उध्वस्त हाेऊन जातं. स्वतःबराेबरच कुटुंबाची फरफट हाेत जाते. अशातच पुन्हा समाजाकडून स्विकारले जाईल की नाही अशी भिती अनेक कैद्यांमध्ये असते. कैदी असले तरी त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी या हेतूने कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम कारगृह प्रशासनाकडून करण्यात येत असते. येरवडा कारगृहामध्ये 200 पेक्षा अधिक चांगल्या वर्तनुकीचे कैदी हे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यंना विविध कामात मदत करत असून त्यांच्या कामाचे त्यांना वेतनही देण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना एक सुधारण्याची संधी मिळत असून कारागृहप्रशासनावरील ताण कमी हाेण्यास मदत हाेत अाहे. 

    सध्याच्या घडीला येरवडा कारागृहात साडेपाच हजाराहून अधिक कैदी अाहेत. तर कारागृहाची क्षमता केवळ 2449 इतकी अाहे. राेज या कैद्यांच्या संख्येमध्ये भर पडत असते. यातील काही कैदी हे अनावधानाने हातून घडलेल्या एका चुकीची शिक्षा भाेगत असतात. त्यांचा राग त्यांना येथे घेऊन अालेला असताे. कारागृहात अाल्यानंतर त्यांना अापल्या चुकीचा पश्चाताप झालेला असताे. अशा चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून विविध कामे दिली जातात. हे कैदी कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात. कैद्यांच्या तुलनेत कारागृह कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने हे कैदी त्यांचे मदतनीस हाेतात. इतर कैद्यांवर नजर ठेवणे, स्वयंपाक घरातील विविध कामं करणे, रात्री अाळीपाळीने जागरण करुन इतर कैद्यांवर लक्ष ठेवणे, कैद्यांना मुलाखतीला घेऊन जाणे तसेच एखाद्या कैद्याला हाॅस्पिटल मध्ये घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्याला मदत करणे अशी विविध कामे ते करत असतात. त्यांना या कामाचे वेतनही प्रशासनाकडून दिले जाते. 

     याबाबत बाेलताना कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले, चांगल्या वर्तनुकीचे दाेनशेहून अधिक कैदी हे कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात. त्यामुळे कारागृहाचे नियाेजन संभाळण्यासही मदत हाेते. तसेच या कैद्यांच्या पुनर्वसनात याचा माेठा फायदा हाेताे. त्यांच्या कामाचे त्यांना वेतनही दिले जाते. त्याचबराेबर अाम्ही ठराविक कालावधीनंतर कैद्यांची पंचायत सुद्धा घेत असताे. त्यात कारागृहातील विविध विषयांवर चर्चा केली जाते. 

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाyerwada jailयेरवडा जेलPrisonतुरुंग